सुळगा हिंडलगा येथील ब्रह्म लिंग मंदिरासमोर गटारीचे सांडपाणी तुंबल्याने समस्या निर्माण झाली आहे. येथील गटारी ओव्हरफ्लो होऊन सर्व सांडपाणी रस्त्यावर आल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असल्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
गेल्या महिन्याभरापासून ही परिस्थिती जैसे थे असल्याने नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. येथील गटारी वेळेवर साफ न केल्याने सदर समस्या उद्भवली आहे.
तसेच मंदिराच्या भोवती सांडपाणी तुंबल्याने मंदिरात दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांना अडचणीचे ठरत आहे तसेच हे सांडपाणी घालविण्याकरिता प्रशासनाने योग्य उपाय योजना न राबविल्यामुळे येथील परिस्थितीने रौद्र रूप धारण केले आहे
तसेच येथील सांडपाण्यावर डासांचा पहिला मोठ्या प्रमाणात झाल्याने डेंग्यू मलेरिया यासारखे आजार उद्भवण्याची दाट शक्यता आहे.येथील परिस्थितीकडे ग्रामपंचायतीने साफ दुर्लक्ष केले असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच येथील मंदिराभोवती साचलेल्या सांडपाण्याचा लवकरात लवकर निचरा करण्याकरिता ग्रामपंचायतीने योग्य उपाय योजना राबवून येथील सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित करून द्यावा अशी मागणी येथील गावकऱ्यांनी केली आहे.