कालपासून वकिलांचे काम बंद आंदोलन सुरूच आहे. कंज्यूमर आयुक्त फोरम (राज्य ग्राहक न्यायालय )साठी वकिलांनी काल आणि आज आपले काम बंद ठेवून तीव्र आंदोलन छेडले आहे.
बेळगाव मध्ये स्टेट कंझ्युमर आयुक्त फोरम (राज्य ग्राहक न्यायालय )स्थापन करण्यासाठी सरकारने मान्यता दिली होती. तसेच त्यासाठी हालचाली देखील सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र अचानक या निर्णयात बदल करून स्टेट कंझूमर फोरम गुलबर्गा ला हलविण्यात आले. त्यामुळे बेळगाव मध्येच पुन्हा (राज्य ग्राहक न्यायालय )कंज्यूमर आयुक्त फोरम स्थापन करावे या मागणीकरिता येथील वकिलांनी कामावर बहिष्कार टाकला आहे. तसेच काल पासून सर्व वकिलांनी काम बंद ठेवून आंदोलन सुरूच ठेवले आहे.
सरकारने गुलबर्ग्याला कंजूमर आयुक्त फोरम स्थापण्याचा जो निर्णय घेतला आहे त्यामध्ये तातडीने बदल करावा व बेळगाव मध्ये सदर कंज्यूमर आयुक्त फोरम (राज्य ग्राहक न्यायालय )स्थापन करावे अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याकडे दिले . तसेच यामध्ये बदल न झाल्यास सर्व वकील मिळून तीव्र आंदोलन छेडू असा इशारा देखील दिला आहे.