covid-19 ची संभाव्य लाट लक्षात घेऊन सर्वांना पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे. मात्र आता कोरोनाची चौथी लाट येणार असल्याने नागरिकांना बूस्टर डोस घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
येथील केएलई डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल मध्ये कोरूना विरुद्ध लढा देण्याकरिता पहिला दुसरा व बुस्टर डोस देण्यात येत आहे. ज्या नागरिकांचा पहिला आणि दुसरा डोस झालेला आहे त्या व्यक्ती बुस्टर डोससाठी पात्र आहेत.
बूस्टर डोस घेण्याकरिता दुसरा डोस झालेल्या तारखेपासून 9महिने पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच सदर बूस्टर डोस देण्यात येत असून त्याकरिता प्रमाणपत्र व आधार कार्ड सोबत आणणे आवश्यक असल्याचे कळविण्यात आली आहे.
के एल ई मध्ये बूस्टर डोस देण्यात येत असून अधिक माहितीसाठी 0831-2473777 या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.