जागतिक योग दिनाचे औचित्य साधून येथील जाधव नगर मधील एनसीसी मैदानावर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला
यावेळी येथील 26 व 8 एअर विंग कर्नाटक बटालियन एनसीसी यांनी प्रात्यक्षिक सादर केले. याप्रसंगी पतंजली संस्थेचे गुरु पुरुषोत्तम पाटील व संगीता कानपुरे यांनी सर्वांना योगाची प्रात्यक्षिके दाखविली.
यावेळी एनसीसी मैदानात पार पडलेल्या योगा दिनानिमित्त 26 कर्नाटक बटालियन एनसीसी चे कर्नल राजू खजुरिया कर्नल दर्शन सुभेदार मेजर निलेश देसाई सुभेदार वसंत महागावकर तसेच 8 एअर विंग जेडब्ल्यू ऑफिसर संतोष कुमार व सी आर बीजू यांच्यासह एनसीसी छात्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.