जिल्हा प्रशासन ,जिल्हा पंचायत ,महानगरपालिका ,आयुष विभाग ,युवा सक्षमीकरण विभाग ,सार्वजनिक शिक्षण विभाग ,पर्यटन विभाग आणि राणी चन्नम्मा विद्यापीठ ,स्काऊट अँड गाईड ,सेवादल ,नेहरू युवा केंद्र तसेच पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आज सुवर्ण विधानसौध येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला.
यावेळी या योग दिनात आंतरराष्ट्रीय योग पंचचे तसेच चन्नम्मा विद्यापीठाच्या योग शिक्षिका आरती संकेश्वरी यांनी उपस्थितांना स्कन्द संचलन ,ताडासन ,वृक्षासन ,पद्मासन ,हलासन ,भुजंगासन अर्थ चक्रासन त्रिकोणासन ,भद्रासन यासह योगासनाची अनेक आसने करून दाखविली.
त्यानंतर उपस्थितांनी देखील त्यांच्याप्रमाणेच आसने केली. त्यानंतर दक्षा हिने भरतनाट्यम द्वारे अप्रतिम योगासने करून उपस्थितांची वाहवा मिळवली. याचबरोबर जैन हेरिटेज शाळेच्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेत अनेक आसनांची प्रात्यक्षिके दाखविली.
या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला खासदार मंगला अंगडी ,राज्यसभा सदस्य इराना कडाडी ,जिल्हाधिकारी नितेश पाटील ,पोलीस आयुक्त डॉक्टर एम बी बोरलिंगय्या, स्काऊट अँड गाईड चे छात्र ,सेवादल नेहरू युवा केंद्र ,यांच्यासह पतंजली योग समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.