आज होणारी गणेश महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची आणि पोलिसांची बैठक काही कारणास्तव रद्द करण्यात आली आहे.अशी माहिती गणेश महामंडळ जनसंपर्कप्रमुख विकास कलगटगी व सुनील जाधव यांनी दिली आहे
आज सायंकाळी चार वाजता मार्केट एसीपी कार्यालय येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते मात्र तांत्रिक अडचणीमुळे ही आयोजित करण्यात आलेली बैठक पुढे ढकलण्यात आली असून याची सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच पुढील बैठक कधी आणि केव्हा होईल याबद्दल माहिती देण्यात येईल अशी माहिती देखील देण्यात आली असून सर्वांनी याची नोंद घ्यावी असे कळविण्यात आले आहे