No menu items!
Thursday, August 28, 2025

‘2047 पर्यंत भारताला इस्लामिक देश बनवण्याचे पी.एफ.आय.चे षड्यंत्र?’*

Must read

हिंदूंनी वैयक्तिक सुख-दु:ख आणि हानी यांचा विचार न करता राष्ट्ररक्षणासाठी पुढाकार घेतला तरच राष्ट्र वाचेल ! – महंत दीपक गोस्वामी

‘वर्ष 2047 मध्ये भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्यासाठी 10 टक्के मुसलमानांनी साहाय्य केले, तर दुबळ्या बहुसंख्यांकांना (हिंदूंना) गुडघ्यावर टेकवून इस्लाम स्वीकारण्यास बाध्य करू’, असे आत्मविश्वासाने सांगणार्‍या ‘पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या (पी.एफ्.आय.च्या) कागदपत्रांकडे हिंदूंनी डोळेझाक करू नये. याच वृत्तीमुळे भारताचाच एकेकाळी भाग असणारा अफगाणिस्तान, पाकिस्तान, श्रीलंका आपण गमावले आहेत. आज आपली काहीतरी हानी होईल, या भीतीने मागे राहिलो, तर उद्या राष्ट्रच उरणार नाही. राष्ट्र आपले राहिले नाही, तर मग आपलेही काही शिल्लक रहाणार नाही. ‘सेक्युलर’ सरकारही रहाणार नाही. आज झारखंड राज्यातील एका शाळेत मुसलमान विद्यार्थ्यांची संख्या 70 टक्क्यांपेक्षा अधिक झाल्यावर तेथे हिंदू विद्यार्थ्यांना हात जोडून प्रार्थना करण्यास थेट बंदी केली आहे. त्यामुळे आता हिंदूंनी आपले वैयक्तिक सुख-दु:ख आणि हानी यांचा विचार न करता राष्ट्ररक्षणासाठी पुढाकार घेतला, तरच हे राष्ट्र वाचेल, असे स्पष्ट प्रतिपादन राजस्थान येथील ‘ज्ञानम् फाऊंडेशन’चे संस्थापक महंत दीपक गोस्वामी यांनी केले आहे. हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘2047 पर्यंत भारताला इस्लामिक देश बनवण्याचे पी.एफ्.आय.चे षड्यंत्र?’ या विषयावरील ऑनलाईन ‘विशेष संवादा’त ते बोलत होते.

यावेळी बिहार येथील ‘भारतीय जनक्रांती दला’चे राष्ट्रीय महासचिव अधिवक्ता राकेश दत्त मिश्रा म्हणाले, बिहारच्या घटनेवरून पी.एफ्.आय. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची तुलना चुकीची आहे. पी.एफ्.आय. विविध घातक शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देऊन देशात हिंसक कृत्ये करत आहे, तर रा.स्वं. संघ ही देशप्रेमी संघटना नागरिकांना स्वसंरक्षण प्रशिक्षण शिकवत आहे. खरे तर संघाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे बिहारचे पोलीस अधिकारी मानवजीतसिंह डिल्लोन यांचे खलिस्तानी आतंकवाद्यांशी काही संबंध आहेत का, याची चौकशी केली पाहिजे.

‘पी.एफ्.आय.’सारख्या देशविघातक संघटनांवर बंदी आणा !

यावेळी हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे म्हणाले की, तुर्कस्थानचा ‘आय.एच्.एच्.’ (IHH) हा गुप्तचर गट दानाच्या नावाखाली जगभरात आतंकवादी कृत्ये करत असतो. याच गटासह पी.एफ्.आय.च्या अनेक बैठका झाल्या आहेत. चीनकडून पी.एफ्.आय.ला कोट्यवधी रुपये मिळाले आहेत. तिचीच दुसरी संघटना ‘कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया’ (सी.एफ्.आय.) आणि अन्य संघटनांना 100 कोटी मिळाल्याचे ‘ईडी’च्या चौकशीत पुढे आले आहेत. ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’ला विरोध करण्यासाठी पी.एफ्.आय.ला विविध देशांतून 120 कोटी रुपये आले आहेत. अनेक हिंदुत्ववाद्यांच्या हत्या या संघटनेने केल्या आहेत. बंदी घातलेल्या ‘सिमी’चेच लोक पी.एफ्.आय. संघटनेच्या माध्यमांतून देशविघातक कृत्ये करत आहेत. याच संघटनेच्या केरळमधील रॅलीत 10 वर्षांच्या मुलाने हिंदूंचा नरसंहार करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे ‘पी.एफ्.आय.’सह संलग्न देशविघातक संघटनांवर बंदी आणली पाहिजे.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!