सरकारने आधीच सर्व वस्तूंचे दर वाढवले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसली असतानाच आता जीएसटी वरील कर देखील वाढविण्यात आले असल्याने सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे .त्यामुळे सरकारने जीएसटी मध्ये केलेली मागे घ्यावी अशा मागणीचे निवेदन बेळगाव वकील संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे.
आधीच तेल इंधन पेट्रोल डिझेल यांचे दर वाढले आहेत.तसेच सरकारने आता आता आवश्यक गोष्टींच्या जीएसटी मध्ये देखील दरवाढ केली आहे. त्यामुळे ही दरवाढ सरकारने मागे घ्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
जर सरकार अशाच प्रकारे दरवाढ करत राहिल्यास सर्वसामान्य नागरिक आणि गोरगरीब जनता एकत्र येतील आणि येणाऱ्या निवडणुकीत चांगला धडा शिकवतील असा इशारा देखील या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.