बेळगाव मध्ये प्रदूषण वाढले असल्याने आज जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव प्राइड सहेली यांच्या वतीने शहरात बाईक रॅली काढली. आणि दुचाकी मुळे होणारे प्रदूषण कशाप्रकारे थांबवावे याकरिता माहिती दिली.
त्यावेळी या बाईक रॅलीची सुरुवात कॉलेज रोड पासून करण्यात आली याप्रसंगी अतुल पुरोहित यांनी बाईक रॅलीची सुरुवात केली तसेच यावेळी संभाजी चौकात त्याची सांगता करण्यात आली.
याप्रसंगी बाईक रॅलीमध्ये प्रत्येकाने आपल्या बाईकवर सेव पॉल्युशन बॅनर लावले होते.
यावेळी दुचाकी स्वरांना आपल्या दुचाकी संबंधी कशाप्रकारे काळजी घ्यावी याबद्दल परिपत्रके वाटून जनजागृती करण्यात आली. तसेच बाईकची नेहमी तपासणी करावी पियूसी करावे तसेच प्रदूषण रोखण्याकरिता काळजी घ्यावी याबद्दल अध्यक्ष भारती शहा यांनी माहिती दिली.
याप्रसंगी जिगनाशहा मंदालसा चौगुले रूपा मंगावती श्रुती मेहता पवन रजपूत अश्विनी रोकडे यांच्यासह जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम प्राईड सहलीच्या सदस्य उपस्थित होत्या.