लोखंडाने भरलेल्या ट्रकची एका बालकाला जोराची धडक दिल्याने सदर बालक जागीच ठार झाला असून त्याचा या अपघातात चेंद्रामेंद्रा झाला आहे.सदर घटना आज सकाळी कॅम्प परिसरात घडली.
कॅम्प येथे मार्गावर स्पीड बेकर नसल्याने अनेक अवजड वाहने सुसाट वेगाने धावत असतात.याभागात अनेक शाळा असल्याने विद्यार्थ्यांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणात झालेली असते. आज सकाळी या ठिकाणी भरधाव वेगाने असणाऱ्या एका लोखंडने भरलेल्या ट्रकने बालकास जोराची धडक दिल्याने तो जागीच ठार झाल्यामुळे कॅम्प परिसरातील नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे
तसेच येथील नागरिकांनी सदर ट्रकला अडविले असून जोपर्यंत यावर कारवाई होत नाही तोपर्यंत या ठिकाणी ठाण मांडून बसण्याचा निर्धार केला आहे.
अपघात घडला तेव्हा या ठिकाणी बघायची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती तसेच मोठा फौज फाटा देखील आला होता. दोन दिवसांपूर्वी शहरात असाच अपघात फोर्ट रोड वरील खिमजीभाई पेट्रोल पंपा समोर घडला होता. आणि या घटनेत एका सोळा वर्षीय महाविद्यालयीन युवतीचा मृत्यू झाला होता.
तर आता आज सकाळी घडलेल्या घटनेत शालेय विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत झाल्याने शहरवासीयांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी घटनास्थळी सदर बालकाच्या कुटुंबीयांचा आक्रोश हा हृदय पिळवटून टाकणारा होता.