हैदराबाद स्थित मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड (MEIL) च्या हायड्रोकार्बन विभागाच्या मेगा गॅसने बेळगाव येथे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) च्या सहकार्याने येथील मारुती नगर जवळ चौथ्या कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) स्टेशनची सुरुवात केली आहे
मेगा गॅस आधीच बेळगाव शहरातील घरांना गॅस पुरवठा करत आहे. तसेच 2019 पासून सीएनजीची विक्री सुरू केली आहे. तर आता कंपनी येत्या काही दिवसांत बेळगाव जिल्ह्यात आणखी स्टेशन उभारणार आहे.अशी माहिती प्राप्त झाली आहे.
बेळगावमधील मेगा गॅस सीएनजी ही आहेत स्टेशन
बेळगाव येथील सीएनजी स्टेशन
मेगा गॅस सीएनजी स्टेशन-गांधी नगर इंडियन ऑइल पेट्रोल पंप, आरएस नंबर 1056/2, गांधी नगर, जकरिया मोहल्ला.
मेगा गॅस CNG स्टेशन, खानापूर रोड-
इंडियन ऑइल पेट्रोल पंप, Sy No 349-5/1, खानापूर रोड, NH 748, उद्यमबाग खानापूर रोड.
मेगा गॅस सीएनजी स्टेशन, कंग्राळी- भारत पेट्रोलियम पेट्रोल पंप, एनएच 4, कंग्राळी, बेळगाव आणि मेगा गॅस सीएनजी स्टेशन, एअरपोर्ट रोड मारुती नगर येथे सुरु केले आहे.