सरकारने एक आदेश जारी केला आहे. त्या आदेशामध्ये अंगणवाडीत पाळणाघर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आधीच असलेल्या कामांमधून सवड मिळत नसल्याने अंगणवाडीमध्ये पाळणाघर नको या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
अंगणवाडी वर्कर आणि हेल्पर फेडरेशनच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले. जर अंगणवाडीमध्ये पाळणाघर सुरू केले तर अंगणवाडी सेविकांना त्यांची कामे करताना अडथळा निर्माण होणार तसेच जर अंगणवाडी सेविका सर्वे करण्यासाठी बाहेर गेल्या तर पाळणाघरातील मुलांकडे कोण लक्ष देणार जर उद्या बरे वाईट काही झाले तर त्याला कोण जबाबदार राहणार असा प्रश्न अंगणवाडी सेविकांनी उपस्थित केला आहे.
त्यामुळे पाळणाघर करावे मात्र ते अंगणवाडीमध्ये न करता दुसरीकडे करावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.