दोन दिवसांपासून मुसळधार पडत असलेल्या पावसाने शहर जलमय झाले आहे. येथील डॉक्टर बी आर आंबेडकर मार्गावरील सर्व पाणी चन्नम्मा सर्कल येथे साचले असल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत आहे.
गटारी निमुळत्या झाल्या असल्याने सर्व सांडपाणी रस्त्यावरून वाहत असून नागरिकांना याचा हा त्रास सहन करावा लागत आहे.
तसेच येथील साचलेल्या पाण्याला वाट नसल्याने वाहनधारकांना या पाण्यातूनच वाट काढावी लागत आहे.
दर पावसात चन्नम्मा सर्कल येथे ही समस्या उद्भवत असून या ठिकाणी साचलेल्या पाण्याला वाट करून द्यावी अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.