सिद्धनाथ जोगेश्वरी मंदिराच्या सभागृहात पार पडलेल्या मध्यवर्ती गणेश महामंडळाच्या बैठकीवेळी अध्यक्षपदी रमाकांत कोंडुस्कर यांची निवड करण्यात आली आहे. तर कार्याध्यक्षपदी देवस्थान कमिटी पंच रंजीत चव्हाण पाटील यांची निवड झाली आहे.
सदर बैठक काल पार पडली असून या बैठकीत सर्वानुमते महामंडळाचे अध्यक्ष म्हणून कोंडुस्कर यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी बोलताना कोंडुसकर म्हणाले की सर्व गणेश मंडळांनी विधायक पद्धतीने गणेश उत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तसेच समाजामध्ये अनेक उपक्रम राबवून नागरिकांना हातभार दिला पाहिजे असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी उपाध्यक्षपदी रमेश पावले स्वागताध्यक्षपदी मदन बामणे सरचिटणीस महादेव पाटील निवड करण्यात आली तर जनसंपर्क प्रमुख पदी विकास कलघटगी सचिवपदी सागर पाटील आणि बळवंत शिंदोळकर यांची निवड करण्यात आली.