स्मार्ट सिटीच्या कामाचा फटका नागरिकांना बसत आहे. गटारीतून पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने घर दुकान आणि आता हॉस्पिटलमध्ये देखील पावसाचे पाणी शिरले आहे.
येथील श्रीनगर मध्ये गटारीचे सांडपाणी हॉस्पिटलमध्ये शिरून हॉस्पिटलचे नुकसान झाले आहे. येथील चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये पाणी शिरले असून रुग्णांची आणि कर्मचाऱ्यांची हळसांड होत आहे.
श्रीनगर गार्डन शेजारी असलेल्या डॉक्टर मुर्गेश पाटील हॉस्पिटलमध्ये पाणी शिरले असल्याने त्यांनी स्मार्टसिटीच्या कामाबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. हॉस्पिटलमध्ये शिरलेले पावसाचे पाणी बाहेर काढण्यासाठी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.
येथील हॉस्पिटल बरोबरच स्टेशनरी दुकान आणि आणि व्यवसायिकांच्या दुकान मध्ये देखील पावसाचे पाणी शिरले असल्याने त्यांच्या दुकानातील झेरॉक्स मशीन स्टेशनरी साहित्य लॅपटॉप यासह आधी साहित्य पाण्याने खराब झाली आहेत.
दरवर्षी या परिसरात हीच परिस्थिती उद्भवते मात्र आता या समस्येने डोके वर काढले असल्याने यावर लवकरात लवकर योग्य उपाय योजना राबवावी अशी मागणी येथील व्यवसायिकांनी केली आहे.