जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी भारत नगर चौथा क्रॉस येथे पावसामुळे कोसळलेल्या घराची पाहणी केली. आणि कुटुंबियांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली
गेल्या दोन दिवसांपासून शहरात पडत असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे तसेच अनेकांच्या घरात पाणी देखील शिरले आहे.
त्याचबरोबर काही ठिकाणी झाडे आणि घरे देखील पडली आहेत. त्यावेळी येथील भारत नगर चौथा क्रॉस येथील आनंद बिर्जे यांचे घर देखील विचित्र अवस्थेत कोसळले होते.
त्यामुळे याची पाहणी करण्याकरिता जिल्हाधिकारी नितेश पाटील हे आज आले आणि त्यांनी सदर कुटुंबियांची विचारपूस केली तसेच शासनातर्फे नुकसान भरपाई मिळवून देण्याचा प्रयत्न करू असा आश्वासन दिले.