शास्त्रीनगर येथील दि आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित ज्ञानमंदिर इंग्लिश मीडियम शाळेमध्ये आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे
यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .यातील विविध स्पर्धांचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अलका जाधव यांनी प्रास्ताविक करून मुलांना प्रोत्साहन पर स्वागत पर भाषण केले .
यावेळेस मुलांनी वेशभूषा स्पर्धा, चित्रकला, भाषण व देशभक्तीपर गीत सादर केले. यावेळेस कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल देसाई यांनी केले, व आभार प्रदर्शन शितल पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.