गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने शहर जलमय झाले असून शिवाजीनगर येथे नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे.
त्यामुळे नागरिकांना घरात राहायचे कसे असा प्रश्न पडला असून त्यांचे जगणे मुश्किल झाले आहे.
दर पावसाळ्यात शिवाजीनगर मध्ये ही समस्या उद्भवते त्यामुळे ही समस्या याही वर्षी उद्भवू नये याकरिता योग्य प्रशासनाला याबद्दल माहिती देण्यात आली होती.
या ठिकाणी असलेल्या गटारी आणि नाला देखील पावसाळ्यापूर्वी स्वच्छ करण्यात आला होता. मात्र वीरभद्र नगर आरटीओ सर्कल शिवाजीनगर पहिली दुसरी तिसरी आणि चौथी गल्ली येथील पाणी येथील नाल्याला येऊन मिळत असल्याने शिवाजीनगर पहिली गल्ली दुसरा क्रॉस येथे रस्त्यावर पाणी साचून राहिले आहे.
त्यामुळे प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन येथील उद्भवलेली नागरिकांची समस्या त्वरित मार्गी लावावी अशी मागणी देखील नागरिकांनी केली आहे.