ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे त्यांच्या राहत्या घरी आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यामुळे चित्रपटसृष्टीतील सर्व कलाकार हळहळ व्यक्त करत आहेत
एक हसता खेळता चेहरा सर्वांमधून गेल्याने चित्रपट सृष्टीतील सर्व कलाकार दिग्दर्शक निर्माते यांना अश्रू अनावर झाले आहेत. नेहमी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात भुरळ पाडणाऱ्या मराठी चित्रपट सृष्टीतील या अभिनेत्याचे वयाच्या 52 व्या वर्षी निधन झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
नवरा माझा नवसाचा मी शिवाजीराजे भोसले बोलतोय याशिवाय अनेक चित्रपट नाटक आणि मालिकांमध्ये उत्कृष्ट भूमिका त्यांनी साकारल्या होत्या. तसेच मोरूची मावशी हे त्यांचे रंगभूमीवरील नाटक जबरदस्त गाजले होते. प्रदीप पटवर्धन यांच्या निधनामुळे सध्या सर्वत्र शोकपणा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपट सृष्टी मध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.