सध्या बाजारपेठ सजली आहे ती विविध नमुनांच्या राख्यांनी. रक्षाबंधन अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपल्याने सर्व महिला युवती राखी खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी करत आहेत.
गुरुवारी राखी पौर्णिमा असल्याने आपल्या भावाला राखी बांधण्याकरिता तसेच त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करण्याकरिता अनेक बहिणी सज्ज झाल्या आहेत.
राख्यांशिवाय बाजारपेठेत विविध गिफ्ट देखील आले आहेत. एक रुपयापासून ते हजारो रुपयांपर्यंत डझन सिंगल अशा किंमतीत राख्या उपलब्ध आहेत.
गेल्या दोन वर्षांपूर्वी आलेल्या महापुराच्या संकटामुळे तसेच कोरोनामुळे राख्या ची विक्री म्हणावी तितकी झाली नव्हती. मात्र आता सध्या सर्व सुरळीत चालू असल्याने राख्यांची विक्री मोठ्या प्रमाणात झाली असल्याचे व्यवसायिकांनी सांगितले आहे.
यावर्षी राखी मध्ये वेगवेगळे नमुने आणि वरायटी देखील आल्या आहेत भावाला बांधण्याकरिता वेगळी राखी आहे तसेच भाभी आणि भावाला बांधण्याकरिता वेगळी दाखल झाली आहे.
पांगुळ गल्लीतील सर्व दुकाने राख्यांनी सजली आहेत. काही नोकरदार महिलांनी रविवारी सुट्टीच्या दिवशीच राखी खरेदी करून ठेवल्या आहेत. तर काही युवती आज आणि उद्या अशा दोन दिवसात राख्यांची खरेदी करणार असल्याने बाजारपेठेत मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.