दरवर्षीप्रमाणेच यावर्षी सुध्दा भारतीय स्वातंत्र्य दिवस 75 वा अमृतोत्सवी वर्ष मोठया प्रमाणात साजरा करण्यात आला.
यानिमित 2022 सालाच्या दहावी उत्तीर्ण पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थिनींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला व मंडळाकडून या विद्यार्थिनींचा स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले .
यावेळी स्वातंत्र्यासाठी प्राणाचे बलिदान दिलेल्या स्वातंत्र्ययोध्यांचे स्मरण करून त्यांनाही या कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले .यावेळी मान्यवर व श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.