सरस्वती वाचनालयात जमला भक्तीचा मेळा., तारांगण, वैशाली स्टोन क्रशर, आणि जननी ट्रस्ट यांच्या विद्यमाने ऑनलाइन नादब्रह्म भजन स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेचा बक्षीस समारंभ प्रमुख पाहुण्या डॉ. मंजुषा गिजरे, आणि रुक्मिणी निलजकर यांच्या उपस्थितीत पार पडला.
भजन कीर्तन संगीतामुळे आरोग्य चांगले राहते. मनशांती मिळते. संगीताचा औषधी थेरपीत सुद्धा चांगला उपयोग होतो. असे त्या म्हणाल्या.
मुख्य प्रायोजक उद्योजिका रुक्मिणी निलजकर यांनी पंढरीच्या वारीचे अदभुत वर्णन केले. प्रत्येकाने एकदा तरी वारी केली पाहिजे.भक्ती बरोबर शारीरिक व्यायाम ही वारी मध्ये होतो . असे त्या म्हणाल्या.
भजन स्पर्धेचे परीक्षक विजय बांदिवडेकरांनी संगीतातील सा कसा लावायचा. त्यातील आरोह आवरोह, संगीताचे नियम याविषयी माहिती दिली.
तारांगणच्या संचालिका अरुणा गोजे पाटील यांनी भजन स्पर्धेच्या सर्व भजनी मंडळाचे कौतुक करून, महिलांना सर्व क्षेत्रात पुढे येण्याचे आवाहन केले.
या भजन स्पर्धेत एकूण २२ मंडळांनी भाग घेतला. त्यातील नऊ मंडळे बक्षिसाचे मानकरी ठरले.
प्रथम क्रमांक… श्री सद्गुरू महिला भजनी मंडळ भाग्यनगर.
द्वितीय क्रमांक…. श्री साई राम महिला भजनी मंडळ टिळकवाडी.
द्वितीय क्रमांक….. श्री विठ्ठल रुक्माई महिला भजनी मंडळ कंग्राळी खुर्द
तृतीय क्रमांकाचे तीन मानकरी
प्रथम क्रमांक… श्री कालिका देवी महिला भजनी मंडळ बापट गल्ली.
द्वितीय क्रमांक… गजानन महिला भजनी मंडळ कचेरी गल्ली शहापूर.
तृतीय क्रमांक… माऊली महिला भजनी मंडळ शास्त्रीनगर
उत्तेजनार्थ तीन बक्षिस
प्रथम क्रमांक… श्री ज्ञानेश्वर महिला भजनी मंडळ वडगाव.
द्वितीय क्रमांक… गौरी महिला भजनी मंडळ वडगाव.
तृतीय क्रमांक… स्वामी समर्थ महिला भजनी मंडळ किनये
सौ स्मिता किल्लेकरांच्या भक्तिमय सूत्रसंचालनात कार्यक्रम छान संपन्न झाला. यावेळी तारांगण केंद्र संचालिका जयश्री दिवटे, नेत्रा मेनसे,सविता चिल्लाळ,अर्चना पाटील सविता वेसने उपस्थित होत्या.