कोरोनाच्या संकटामुळे गेली दोन वर्षे बारावीच्या परीक्षेवर मोठे संकट निर्माण झाले होते .परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले होते. त्यामुळे यंदा एप्रिल मध्ये होणाऱ्या बारावीची परीक्षेची मॉडेल प्रश्नपत्रिका पदवीपूर्व शिक्षण खात्याने उपलब्ध करून दिली आहे .विद्यार्थ्यांना pue.kar. nic. in या संकेत स्थळावर जाऊन प्रश्नपत्रिका डाऊनलोड करून अभ्यास करता येणार आहे.
यावेळी बारावीची परीक्षा लवकर होणार आहे. तसेच शिक्षण खात्याने देखील परीक्षेचे वेळापत्रक ही जाहीर केले आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी देखील अभ्यासाला सुरुवात केली असून सर्वच महाविद्यालयांमध्ये अभ्यासक्रम पूर्ण करण्याची लगबग सुरू झाली आहे. तसेच पदवीपूर्व शिक्षण खात्याच्या संकेतस्थळावर देखील मॉडेल प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात आली आहे.