आरटीओ सर्कल पाच नंबर शाळेकडून जात असताना अचानक एका दुचाकी स्वारावर झाड कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे.
या घटनेत दुचाकीस्वार राकेश सुलदार वय 26 राहणार सिद्धन हळळी बेळगाव असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.
सदर युवक आज सकाळी दुचाकीवरून आरटीओ कडून कोर्ट कडे जात होता. यावेळी या दुचाकी स्वारावर झाड कोसळून तो जागीच ठार झाला तर अन्य एक दुचाकी स्वार या घटनेत जखमी झाला असून त्याला दाखल करण्यात आले आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच मार्केटचे एसीपी एन व्ही बरमनी पीएसआय विठ्ठल हवनावर यांच्यासह वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मार्गावर उपलब्ध झालेला अडथळा दूर केला. तसेच सदर युवकाचा पंचनामा करून त्याचा मृतदेह शवागृहात हलविले.