रोटरी क्लब बेळगाव मिडटाऊन तर्फे दांडिया गरबा फेस्टचे आयोजन करण्यात आले असून सदर फेस्टचा उद्घाटन सोहळा सोमवारी 26 रोजी सायंकाळी सात वाजता मोठ्या थाटात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके उपस्थित होते.
तसेच रोटरीचे जिल्हा प्रांतपाल व्यंकटेश उर्फ बबन देशपांडे तसेच क्लबचे अध्यक्ष विजय पुजार, सचिव आनंद गुमास्ते,चंद्रकांत दांडगी सतीश मिठारे, इव्हेंट प्रमुख नीता बिडीकर या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रमाची सुरुवात रूपा देशपांडे यांच्या गीताने झाली प्रास्ताविक डॉ येशिता पूजार यांनी केले. यावेळी बोलताना उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी रोटरी मिडवून तर्फे आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम म्हणजे सामाजिक कार्याला हातभार असून सदर उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी अध्यक्षीय भाषणात विजय पुजा यांनी दांडिया बद्दल सखोल माहिती दिली. नीता बिडकर यांनी सकाळपासून सुरू झालेल्या स्पर्धा आणि सदर स्पर्धेला लाभत असलेला प्रतिसाद याबाबत सांगितले.
गरबा दांडिया फेस्ट म्हणजे परिपूर्ण मनोरंजनाचा खजिना असून सायंकाळी सदर सोहळ्याचा उद्घाटन समारंभ पार पडला मात्र तत्पूर्वी दुपारी भाषण स्पर्धा घेण्यात आल्या सदर स्पर्धेला विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला याबरोबरच सायंकाळी घेण्यात आलेल्या गरबा व दांडिया स्पर्धेत देखील तरुणाईचा सहभाग महत्त्वपूर्ण होता सदर स्पर्धेत यशस्वी झालेल्या विजेत्यांना बाबुराव अनगोळकर, विकास कलघटगी यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आनंद गुमास्ते यांनी केले