बेळगाव जिल्हा सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित बेळगाव जिल्हास्तरीय प्राथमिक अंतरशालेय मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत इस्लामिया प्राथमिक शालेय संघाने अंतिमफेरीत सर्वोदय हायस्कूल खानापूर संघावर ४-० असा दणदणीत विजय संपादन केला.
कॅम्प मधील सेंट मेरीज मैदानावर झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीत इस्लामिया स्कूल संघाने प्रतिस्पर्धी यांना आल्यामुळे अंतिम करीत प्रवेश केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात सरोदे हायस्कूल खानापूर संघाने बेळगाव ग्रामीण शालेय संघावर २-० असा विजय संपादन केला.
उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक रिजवान बेपारी यांच्या हस्ते करण्यात आले. अंतिम सामन्यानंतर बक्षीस वितरण समारंभात पी.ई. ओ. जहीदा पटेल यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना चषक घेऊन गौरवण्यात आले.
यावेळी प्रशांत देवदनम, महेश हागीदळे, आकाश मंडोळकर, मीनाक्षी जाधव, सखील कोतवाल, पंच मानस नायक उपस्थित होते