प्रवाशांना सोयीस्कर व्हावे याकरिता शिनोळी फाटावर आज बेळगाव पणजी बसचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कृष्णा सावंत यांच्या आणि गावातील मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले.
प्रवाशांना सोयीस्कर व्हावे याकरिता चंदगड ते पणजी या मार्गावर बस सेवा सुरू करण्यात आली आहे. येथील गावातील नागरिकांची पणजीला जाण्याची संख्या पाहता त्याना बस करिता अन्य कोणताही त्रास उद्भवू नये याकरिता आज बसचा शुभारंभ करण्यात आला .
याप्रसंगी प्रमोद पाटील विठ्ठल पाटील संजय पाटील रत्नाकर भोगन यांच्यासह गावातील अनेक नागरिक उपस्थित होते