No menu items!
Sunday, December 22, 2024

एका दिवसात अंबाबाईचे 7.74 लाख तर रेणुका देवीचे 4 लाख भाविकांनी घेतले दर्शन

Must read

नवरात्रोत्सवानिमित्त कर्नाटकसह महाराष्ट्रात भाविकांनी देवीचे दर्शन घेण्याकरिता गर्दी करत आहेत. येथील महाराष्ट्र कोल्हापुरातील अंबाबाईचे काल जवळपास 7,72,721लाख भाविकांनी दर्शन घेतले. तर वाडी रत्नागिरी येथील दख्खनच्या पठाऱ्यात बसलेल्या ज्योतिबा देवाचेही असंख्य लाखो भक्तांनी दर्शन घेतले.

यावेळी जवळपास एका भक्ताला चार तास रांगेत उभे राहावे लागले. तर कर्नाटकातील सौंदत्ती यल्लामा येथे काल जवळपास चार लाखाहून अधिक भाविकांनी यल्लमा देवीचे दर्शन घेतले.

यावेळी भाविकांच्या जवळपास तीन ते चार किलोमीटर परिसरात लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. नवरात्रोत्सव काळात मंदिरात भाविकांची गर्दी होणार लक्षात घेऊन कर्नाटकसह महाराष्ट्रातील इतर देवस्थान मध्ये योग्य उपायोजना राबवून बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

तसेच नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यल्लमा देवी येथील रेणुका देवीच्या मंदिरात रेणुका देवीची विशेष अलंकाराने पूजा करण्यात आली होती. यावेळी महाराष्ट्र कर्नाटक गोवा यासह विविध भागातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच परिवहन मंडळाने नवरात्रोत्सव काळात भाविकांना सोयीस्कर व्हावे याकरिता महाराष्ट्र आणि कर्नाटकात जादा बसेस सोडल्या होत्या.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!