दसरोत्सवा निमित्त विजयादशमी दिवशी येथील हिंडलगा मधील तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती आणि युवा आघाडी शाखेच्या वतीने उद्या बुधवार दिनांक 5 रोजी सकाळी आठ वाजता मुला मुलींसाठी खुल्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर स्पर्धा गाव मर्यादित असणार आहे. तसेच ही स्पर्धा लहान गट आणि मोठा गट अशा दोन विभागात घेतली जाणार असून विजेत्यांना आकर्षक बक्षीसही दिली जाणार आहेत. तरी इच्छुक स्पर्धकांनी आपली नाव नोंदणी करून स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी 9980384556 या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.