कॅम्प येथील युनियन जिमखाना लिमिटेडच्या सचिवपदी प्रसन्न सुंठणकर तर संचालक पदी सुहास कुलकर्णी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
कॅम्प येथील युनियन जिमखाना लिमिटेडची 86 वी वार्षिक सर्वसाधारण सभा गेल्या शुक्रवारी खेळीमेळीत पार पडली. या बैठकीमध्ये उपरोक्त निवड केली गेली. वार्षिक सभेच्या प्रारंभिक जिमखानाचे दिवंगत सभासद सुशील दंडी, रमेश शिंदे व बसवराज पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. जिमखाना अध्यक्ष चंद्रकांत बांडगे यांनी वार्षिक अहवाल सादर केला. त्याला सर्वांनी अनुमोदन दिले.
याप्रसंगी सचिव प्रसन्ना सुंठणकर व संचालक सुहास कुलकर्णी यांचा अध्यक्ष चंद्रकांत बांडगे व उपाध्यक्ष संजय पोतदार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. वार्षिक सभेस युनियन जिमखानाचे संचालक सुधाकर पाटणकर, संजय मोरे, संजय चव्हाण आदिंसह बहुसंख्य सभासद उपस्थित होते. शेवटी संजय पोतदार यांनी सर्वांचे आभार मानले.