बेळगाव दिनांक
नुकत्याच पदवी पूर्व शिक्षण खाते बेळगाव व बेळगाव जिल्हा अंतर्गत विविध तालुक्यांमध्ये संपन्न झालेल्या विविध क्रीडा प्रकारात पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड करण्यात आली आहे.
विविध पदवी पूर्व कॉलेजच्या माध्यमाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धा उदा. कुस्ती स्पर्धेत कु. उमेश शीरगूम्पी 61 किलो वजन फ्री स्टाईल कुस्ती गटामध्ये प्रथम क्रमांक, कु. कुमार तळवार 65 किलो वजन फ्री स्टाइल कुस्ती गटामध्ये प्रथम क्रमांक, कु. हनुमंत भोवी 74 किलो वजन फ्रीस्टाइल कुस्ती गटामध्ये प्रथम क्रमांक, कु. शिवम पाटील 60 किलो वजनी गट ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक, कु. श्रवण हदीमणी 74 किलो वजनी गट ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेत सुवर्ण तसेच जोतिबा पाटील, नागराज चूळकी, तुकाराम डुकरे या क्रीडापटुनी आपल्या वजनी गटांमध्ये रौप्य पदक प्राप्त केले.
दि. 15 आणि 16 ऑक्टोबर 2022 रोजी गदग येथे होणाऱ्या राज्यस्तरीय पदवी पूर्व महाविद्यालयाच्या कुस्ती स्पर्धेकरिता प्रथम क्रमांक विजेत्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. खानापूर येथील बी. व्ही. संबर्गी पदवी पूर्व महाविद्यालयामार्फत आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय थ्रो बॉल स्पर्धेत बेळगाव तालुक्याला विजेतेपद मिळवून देण्यासाठी आमच्या कॉलेजचे विद्यार्थी कु. संदेश लाड व कु. गणेश लाड यांचा मोठा सिंहाचा वाटा ठरला. राज्यस्तरीय थ्रोबॉल स्पर्धा बेंगळूर ग्रामांतर, दोड्डबेळ्ळापूर येथे होणाऱ्या थ्रोबाॅल स्पर्धेकरिता त्यांची निवड झाली आहे.
आपल्या कॉलेजचा विद्यार्थी कु. अरुण माळी याने 65 किलो वजन गट ज्यूडोमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच कु. ओम जूवळी याने गोमटेश पदवीपूर्व महाविद्यालया मार्फत आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय स्विमिंग क्रीडा प्रकारात 100 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक द्वितीय क्रमांक, 200 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक द्वितीय क्रमांक व 100 मीटर बॅक स्ट्रोक प्रकारात तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. वरील सर्व क्रीडापट्टूंची ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेंकरिता निवड झाली आहे. या सर्व क्रीडापटूंना महाविद्यालयाच्यावतीने पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यासाठी प्राचार्या श्रीमती ममता पवार संस्थेचे सचिव श्रीमान प्रकाश नंदिहळी सर तसेच महाविद्यालयाचा शिक्षक वृंद यांचे सहकार्य लाभले. तर क्रीडा प्राध्यापक श्री के एल शिंदे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.