‘हर घर भगवा’ मोहिमेत सहभाग घेऊन हिंदु राष्ट्रासाठी सीमोल्लंघन करा ! – हिंदु जनजागृती समितीचे हिंदूंना आवाहन
हिंदु जनजागृती समितीच्या २० व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने देशभरात ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ साजरा केला जात आहे. या अभियानांतर्गन विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदु राष्ट्राच्या मागणीचा आवाज बुलंद करण्यासाठी समितीने 3 ते 5 ऑक्टोबर 2022 या कालावधीत ‘हर घर भगवा’ या देशव्यापी मोहिमेचा शुभारंभ केला आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेत राष्ट्रप्रेमी नागरिकांनी घरांवर तिरंगा फडकवून देशप्रेम व्यक्त केले. याचप्रकारे आता ‘हर घर भगवा’ मोहिमेत सहभागी होऊन हिंदु राष्ट्र प्रेम व्यक्त करावे आणि हिंदु राष्ट्रासाठी सीमोल्लंघन करून विजयादशमी साजरी करावी, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने केले आहे.
‘हर घर भगवा’ मोहिमेत कसे सहभागी व्हाल ?
‘हर घर भगवा’ या मोहिमेत सहभागी होण्यासाठी भगव्या ध्वज आपल्या घरावर लावून त्यासोबत ‘सेल्फी’ काढावा आणि तो ‘फेसबूक’, ‘ट्वीटर’, ‘इन्स्टाग्राम’ आदी सामाजिक संकेतस्थळावर प्रसारित करावा. फोटो पोस्ट करतांना #HarGharBhagwa हा हॅशटॅग वापरावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने केले आहे. तसेच फोटो पोस्ट करतांना ते हिंदु जनजागृती समितीच्या सोशल मिडीया अकाऊंटला देखील टॅग करावेत, असे समितीने कळवले आहे. या अभियानासाठी समितीने HinduRashtra.HinduJagruti.org हे स्वतंत्र ‘पेज’ चालू केले असून या पेजवर हिंदु राष्ट्रासाठी कटिबद्ध होण्याविषयी प्रतिज्ञा देण्यात आली आहे. आतापर्यंत ही प्रतिज्ञा घेणार्यांना, तसेच ‘हर घर भगवा’ या अभियानात सहभागी होणार्यांना समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र वीर’ प्रमाणपत्र देण्यात येईल. प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी वरील ‘पेज’वर जाऊन ‘फॉर्म’ भरावा, असे समितीने म्हटले आहे.
भगवा ध्वज हा हिंदुत्वाचे प्रतिक आहे; त्यागाचे द्योतक आहे; सनातन भारतीय संस्कृतीचे शाश्वत प्रतिक आहे. याच भगव्या ध्वजाची प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘हिंदवी स्वराज्या’ची स्थापना केली. आजही हिंदवी स्वराज्याच्या धर्तीवर हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे. हिंदूंच्या सर्व समस्यांवर धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र हेच उत्तर आहे. भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने केले आहे.
‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियाना’अंतर्गत आतापर्यंत 33,600 जणांनी हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा घेतली असून, या अभियानात हिंदु राष्ट्रावर आधारित 3000 व्याख्याने, 2000 फलकप्रसिद्धी, 1000 मंदिरांची आणि 250 ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता, 350 महिला संघटन उपक्रम, 200 महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण उपक्रम, 30 ‘हिंदु राष्ट्र संघटन मेळावे’, 50 ‘वर्धापनदिन सोहळे’, 50 ‘हिंदु राष्ट्र परिसंवाद’, 70 पथनाट्ये, 200 संघटन बैठका, 60 अधिवक्ता बैठका आदींचे देशभरात आयोजन करण्यात आले आहे.
आपला नम्र,
हिंदु जनजागृती समिती
सुधीर हेरेकर
(संपर्क : 9845837423