No menu items!
Friday, August 29, 2025

दाटे येथे स्वखर्चाने उभारले गावासाठी सभागृह

Must read

घनश्याम पाऊसकर व विनायक पाऊसकर या बंधूंनी केली गावची वचनपूर्ती

चंदगड :

आपल्या व्यक्तीमत्वाचा विकास खऱ्या अर्थाने समाजामुळे होत असतो . समाजाच्या या ऋणातून उतराई होण्यासाठी दाटे येथील मंत्रालयीन कक्ष अधिकारी श्री . घनश्याम पाऊसकर व एका बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनीत सॉफ्टवेअर इंजीनीयर असलेले श्री. विनायक पाऊसकर या बंधूंनी गावच्या मध्यभागी तीन लाख सत्तर हजार खर्च करून स्व . नारायण व्यंकू पाऊसकर या नावाने सुसज्ज सभागृह बांधले .
गेल्यावर्षी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर गावातील शारदीय नवरात्र उत्सव मंडळ,व ओमकार गणेश मंडळ, यांनी गावात विविध सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सभागृह उभारून देण्याची मागणी केली होती.त्या मागणीस अनुसरुन एका वर्षात सभागृह उभारून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करीन,असा समस्त ग्रामस्थांसमोर श्री. पाऊसकर यांनी शब्द दिला होता.
गावात लग्न समारंभ , कौटुंबिक कार्यक्रम , सार्वजनिक गणेशोत्सव , शारदीय नवरात्र उत्सव करण्यासाठी गावच्या मध्यभागी सभागृहाची आवश्यकता होती . ग्रामस्थांच्या इच्छेखातर श्री . पाऊसकर यांनी सुसज्ज असे सभागृह बांधून दिले .
श्री. पाऊसकर यांनी गावच्या विकासासाठी तरुणाना एकत्र करून रयत सेवा फाउंडेशन स्थापन केले आहे. या फाउंडेशनद्वारे गावात विविध उपक्रम देखील राबविले जातात.
शारदिय नवरात्र उत्सवानिमित्य स्व . नारायण व्यंकू पाऊसकर सभागृहाचे उद्घाटन श्रीमती लक्ष्मी नारायण पाऊसकर यांच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी कार्यक्रमाला सरपंच अमोल कांबळे , माधुरा साबळे, गणपती सातर्डेकर, गणपती किणेकर, ज्ञानेश्वर गावडे , अरुण गुरव, मारूती किंदळेकर, मनोज खरूजकर, परशराम किणेकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!