बेळगाव येथील जुना पीबी रोडवरील शिवाजी महाराज ओव्हर ब्रिजच्या वरच्या रस्त्यावर अनेक खड्डे पडले असून, वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष न देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात स्थानिकांनी खड्ड्यांवर नारळाची रोपे लावून आज अभिनव पद्धतीने निषेध केला.
बेळगावचा स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत मोठ्या प्रमाणात विकास होत असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे. मात्र बेळगाव शहराची अंतर्गत प्रतिमा वेगळी होत चालली आहे .स्मार्ट रस्त्यावर खड्डे पडत आहेत .पथदीप बंद अवस्थेत आहेत .याशिवाय अनेक समस्या उदभवल्या आहेत .
येथील रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना रस्त्यावरून ये-जा करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे .
त्यामुळे जीव मुठीत घेऊन फिरणाऱ्या दुचाकीस्वारांनी एकत्र येऊन रस्त्यावरील खड्डे बुजवण्याकरिता येथील स्थानिक नागरिकांनी अभिनव पद्धतीने विरोध दर्शविला आहे. रस्त्यावर पडलेल्या सखल खड्ड्यांमध्ये नारळाची रोपे लावून लोकप्रतिनिधी आणि स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे.
तर स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकारी मात्र बेळगाव स्मार्टमध्ये मोठ्या प्रमाणात विकास झाल्याचे दिसत असल्याचे थोपटत आहेत. शहरातील प्रकल्प, येथे केवळ खड्डे बुजवण्यासाठी स्थानिक रहिवासी आंदोलन करत आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी व स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी जागे होऊन हे खड्डे आपत्ती येण्याआधीच बंद करून ते जनतेला अनुकूल करावेत, अशी स्थानिकांची मागणी आहे.