No menu items!
Tuesday, September 2, 2025

प्रा. डॉ.सुचेता कुलकर्णी यांना आंतरराज्य गौरव पुरस्कार

Must read

येथील बी. ई. सोसायटी संचालित मॉडेल इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या डॉ. सुचेता उदय कुलकर्णी यांना आंतरराज्य गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे . नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन आणि हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी यांच्या वतीने हा पुरस्कार जाहीर झाला आहे. याचे वितरण शनिवार दि. 8 रोजी सकाळी 11 वाजता येथील धर्मनाथ भवन येथे होणार आहे. या समारंभात तीन राज्यातील मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

डॉ. सुचेता कुलकर्णी यांचे शालेय शिक्षण मुंबई येथे झाले आहे. तेथून मुंबई विद्यापीठातून त्यांनी एम. ए. अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर मुंबई विद्यापीठातूनच पत्रकारिता आणि क्लीनिकल सायकॉलॉजी या विषयांमधील अभ्यासक्रम देखील पूर्ण केलेला आहे. कॅनडा येथील रिचमंड युनिव्हर्सिटी येथील शैक्षणिक व्यवस्थापनाचा तीन महिन्याचा अभ्यासक्रम त्यांनी यशस्वीरिता पूर्ण केला आहे. त्यांना टोंगा विद्यापीठाची पीएचडी पदवी लाभली आहे. यापूर्वी त्यांनी मुंबई सह बेळगावातील विविध शिक्षण संस्थांमध्ये सेवा बजावली आहे .विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्यांचे कार्य सुरू आहे. त्यांना यापूर्वी रोटरी क्लब ऑफ वेणूग्राम संस्थेतर्फे आदर्श शिक्षिका, कल्पवृक्ष फौंडेशनचा पुरस्कार यासह विविध संस्थांकडून उत्कृष्ट प्राचार्या असे सन्मान लाभले आहेत. त्याचबरोबर विम्याची वर अवॉर्ड मधील अकॅडमी एज्युकेशनल लीडरशिप अवॉर्डच्या त्या मानकरी ठरल्या आहेत . यावर्षीचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेल्सन मंडेला ग्लोबल ब्रिलियन्स अवॉर्ड हे देखील त्यांना जाहीर झाले आहे. या नव्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!