भारत विकास परिषदेच्यावतीने राष्ट्रीय समूहगायन स्पर्धा उत्साहात पार पडली. प्रमुख अतिथी म्हणून निवृत्त प्राचार्य व्ही. एन. जोशी उपस्थित होते. व्यासपीठावर परिषदेचे अध्यक्ष विनायक घोडेकर, सचिव मालतेश पाटील, खजिनदार रामचंद्र तिगडी, प्रांत सेक्रेटरी स्वाती घोडेकर, प्रांत समूहगायन संयोजक विनायक मोरे उपस्थित होते. प्रारंभी अक्षता मोरे यांनी संपूर्ण वंदेमातरम् प्रस्तुत केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. अध्यक्ष विनायक घोडेकर यांनी स्वागत केले. रजनी गुर्जर यांनी प्रास्ताविक केले. विनायक मोरे यांनी स्पर्धेचे नियम सांगून परीक्षकांची ओळख करून दिली. परीक्षक म्हणून अरुंधती सुखटणकर, मैथिली आपटे आणि लक्ष्मी तिगडी यांनी काम पाहिले. यावेळी एकूण चार विभागांमध्ये समूहगायन स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेनंतर विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. स्वाती घोडेकर यांनी सूत्रसंचालन केले. सचिव मालतेश पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास डा. जे. जी. नाईक, सुहास गुर्जर, नामाजी देशपांडे, कुमार पाटील, नामदेव कोलेकर, गणपती भुजगुरव, पी. एम्. पाटील, कुबेर गणेशवाडी, पी. जे. घाडी तसेच परिषदेचे सदस्य उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. स्पर्धेचा निकाल – (कन्नड) प्रथम क्रमांक – लव्हडेल सेंट्रल स्कूल, द्वितिय क्रमांक – एम. व्ही. हेरवाडकर स्कूल, तृतिय क्रमांक – उषाताई गोगटे हायस्कूल, उत्तेजनार्थ – एस्.के.ई. भंडारी हायस्कूल, (हिंदी विभाग) प्रथम क्रमांक – एम. व्ही. हेरवाडकर स्कूल, द्वितिय क्रमांक – उषाताई गोगटे हायस्कूल, तृतिय क्रमांक – महिला विद्यालय, उत्तेजनार्थ – जी. जी. चिटणीस स्कूल व के. एल्. एस्. स्कूल, (संस्कृत विभाग) प्रथम क्रमांक – उषाताई गोगटे हायस्कूल, द्वितिय क्रमांक – एम. व्ही. हेरवाडकर स्कूल, तृतिय क्रमांक – अमृता विद्यालयम्, उत्तेजनार्थ महिला विद्यालय व के. एल्. एस्. स्कूल, (लोकगीत विभाग) प्रथम क्रमांक – एम. व्ही. हेरवाडकर स्कूल, द्वितिय क्रमांक – उषाताई गोगटे हायस्कूल, तृतिय क्रमांक – के. एल्. एस्. स्कूल, उत्तेजनार्थ – जी. जी. चिटणीस स्कूल व देवेंद्र जिनगौडा स्कूल
भारत विकास परिषदेच्यावतीने राष्ट्रीय समूहगायन स्पर्धा उत्साहात
By Akshata Naik

Must read
Previous articleसुळेभावी हत्या प्रकरणी 6 आरोपींना अटक
Next articleमराठा मंदिर मध्ये उद्या तालुका म ए समितीची बैठक