बेळगावात मोठ्या प्रमाणात साखर शेतकरी आणि साखर कारखाने आहेत. बेळगावचा सुवर्णसौध रिकामा आहे, त्यामुळे उसाचा भाव निश्चित करण्यासाठी शासनातर्फे बेंगळुरू येथील विधानसौध येथे होणारी बैठक बेळगाव येथील सुवर्णसौध येथे घेण्यात यावी
अशी मागणी यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यानी निवेदनाद्वारे केली .
जर असे न झाल्यास हा संघर्ष अखंड चालू राहील असा इशारा देखील ऊस उत्पादकांनी दिला .तसेच सरकारने उसाचा भाव किमान 4500 रुपये निश्चित करावा, अशी मागणी त्यांनी केली
शासनातर्फे बेंगळुरू येथील विधानसौध येथे होणारी बैठक बेळगाव येथील सुवर्णसौध येथे घेण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे आज करण्यात आली तसेच या मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले.
उत्तर भागात मोठ्या प्रमाणात ऊसाचे कारखाने आहेत. कर्नाटक. येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संख्याही वाढली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी बेळगाव येथील सुवर्णा सौध येथे साखर मंत्री, आयुक्त, सर्व कारखान्यांचे व्यवस्थापकीय , आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांशी ऊस दराच्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी प्राथमिक बैठक घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली .
बंगळुरू येथे बैठक होत असल्याने काही शेतकरी नेत्यांना येणे-जाणे अवघड होत आहे. त्यामुळे ही बैठक बेळगावात घेण्यात यावी, या मागणीचे निवेदन आज जिल्हा आयुक्तांना देण्यात आले.यावेळी प्रदेशाध्यक्ष रवी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज मोकाशी, जिल्हाध्यक्ष चन्नाप्पा गणाचारी आदी उपस्थित होते.