वृत्तपत्र विक्रेता वितरण दिनानिमित्त भाजप ओबीसी मोर्चा कर्नाटक राज्य सचिव व विमल फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. किरण जाधव यांच्यावतीने टाइम्स ऑफ इंडिया आणि विजय कर्नाटक यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगावातील वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार समारंभ श्री. किरण जाधव यांच्या संपर्क कार्यालय न्यू गुड शेड रोड येथे आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमादरम्यान बेळगाव टाइम्स ऑफ इंडियाचे वितरक श्री. दीपक जाधव, टाइम्स ऑफ इंडियाचे विशेष प्रतिनिधी आणि विजय कर्नाटक श्री. अविनाश नाईक, बेळगाव वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष श्री. प्रताप भोसले, श्री. राजू भोसले, श्री. प्रकाश कुलकर्णी, श्री. सुभाष गोरे, श्री. मारिहाळ, श्री. एन. बी. कुलकर्णी, श्री. अशोक शिंदे, श्री. प्रशांत शहापूरकर, श्री. संजय कदम, श्री. प्रभू उपस्थित होते.