कर्नाटकातील समस्त मराठा समाजाला आर्थिक,शैक्षणिक,शेतकीय,नोकरी,व्यवसायिक,प्रशासकीय माध्यमातून समाज उन्नत्ती हेतू 3B मधून2A आरक्षण मिळवे.यासाठी येत्या 20/12/2022 रोजी होणाऱ्या हिवाळी आदिवेशनमध्ये मराठा आरक्षण तसेच अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती सुवर्णसौध बेळगाव येथे उभारावी.यासाठी जनआक्रोशातून जणांदोलनासाठी समाज संभोदनात्मक राज्यव्याप्त विविध संघटना विविध तालुक्यातील समाजवीर मराठा नेते जनजागृती करत आहेत.
त्याचप्रमाणे आपल्या बेळगावातील समस्त समाजाला या जणांदोलनाबद्दल जनजागृती करत या आरक्षणार्थ हक्कासाठी गावोगावी जाऊन आपली कौटुंबिक,व्यवसायिक,राजकीय,प्रतिमा बाजूला सारून समाज कर्तृत्वासाठी आपल्या मराठा समाजाला लाभलेल पहिलं सामाजिक नेतृत्त्व पश्चिम बेळगावातील मराठा नेते,भाजपा बेळगाव ग्रामीण मा.अध्यक्ष,तालुका APMC सदस्य विनय कदम साहेब यांनी जनजागृती करत आहेत.
याची सुरुवात कडोली पंचक्रोशीतील केदनूर,अगसगे,बंबर्गे,हंदीगनूर,च लवेनहट्टी अशा अनेक गावातून करण्यात आली.याप्रसंगी मराठा संघटन अध्यक्ष नारायण झंगरूचे,कर्नाटक क्षत्रिय मराठा फेडरेशन बेळगाव जिल्ह्याचे उपाध्यक्ष महेश रेडेकर,मराठा संघटन(ज)सेक्रेटरी अमोल जाधव,पश्चिम भागाचे नेते संजय पाटील,खाचू सुखये,दिनेश पाटील,हनुमंत गुरव,मोनाप्पा भास्कळ,शंकर सांबरेकर,सुरज पाटील,मारुती राजाई,मधू संभाजी,मदन राजाई,जीत उथळे,आदि मान्यवरा समवेत समस्त समाज बांधव उपस्थित होते.