टिपुच्या नावाखाली करण्यात येणारी ‘सलाम आरतीला’ ‘नमस्कार आरती’ म्हणून परिवर्तीत करणार्या धर्मादाय विभागाचा निर्णय स्वागतार्ह ! – हिंदु जनजागृती समिती
सहस्रो देवस्थाने ध्वस्त करणार्या, शेकडो हिंदू युवतींचे शोषण करून त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्या क्रूर टिपू सुलतानाने त्याच्या काळात देवस्थानांमध्ये ‘सलाम आरती’ला प्रारंभ केला होता. आजतागायत त्याच्या नावाने ही आरती होत असणे ही अत्यंत खेदजनक घटना होती. आज कर्नाटक राज्य धर्मादाय इलाख्याने पुन्हा नामकरण करून ‘नमस्कार आरती’असा त्यात पालट केला आहे. हा निर्णय अत्यंत स्वागतार्ह असून हिंदु जनजागृती समिती राज्य शासनाचे अभिनंदन करत आहे.
टिपूने आपल्या शासन काळात कन्नड भाषेला काढून टाकून पर्शियन भाषेला अधिकृत भाषा म्हणून स्थापित केले. त्याचा परिणाम म्हणजे कर्नाटक राज्यात महसूल खात्यात आज देखील मूळ कन्नड शब्द नसून अरेबिक शब्द आहेत. खाते, तरी, भागय्तु, बंजर, पहणे असे शेकडो शब्द कन्नड मध्ये मिसळले आहेत; एवढेच नव्हे तर अनेक गावे, खेडी, रस्ते यांचे टिपूने इस्लामीकरण करण्याचा प्रयत्न केला.
राज्य शासनाने महसूल इलाख्यातील अरेबिक नावे काढून टाकून कर्नाटकातील स्वच्छ कन्नड शब्द प्रस्थापीत करावेत, असा आग्रह हिंदु जनजागृती समितीने व्यक्त केला.
आपला विश्वासू,
श्री. मोहन गौडा
राज्य प्रवक्ता, कर्नाटक, हिंदु जनजागृती समिती
संपर्क : ७२०४०८२६०९