वसती शाळेत अर्ज करण्याचे आवाहन सध्या करण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष 2022-2023करिता बेळगाव जिल्ह्यात वसती शाळेत प्रवेश सुरू आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे .मोरारजी देसाई वसती शाळा ,कित्तूर राणी चन्नम्मा वसती शाळेत इयत्ता पाचवी पास झालेल्या विद्यार्थ्यांना सहावी प्रवेश देण्यात येत आहे प्रवेश प्रक्रिया 20 मार्चपर्यंत चालणार आहे याची पालक व शिक्षकांनी नोंद घ्यावी तसेच अधिक माहितीसाठी समाजकल्याण खात्याशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.