मराठा मंडळाचे दंत विद्यालय कॉलेज आता सौर ऊर्जेवर तयार होणाऱ्या विजेवर चालणार आहे. येथील मराठा मंडळाच्या नाथाजीराव हलगेकर इन्स्टिट्यूट ऑफ डेन्टल सायन्स अँड रीसर्च सेंटर मध्ये 175 क्षमतेचे 210 केव्ही सौर उर्जेवर चालणारे विद्युतीकरण युनिट सुरु करण्यात आले आहे .या रिसर्च सेंटर मध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन दोन फेब्रुवारी रोजी करण्यात आले. महिन्याकाठी याठिकाणी 25000 युनिट वीज वापरली जाते त्यामुळे अतिरिक्त निर्माण होणारे सौर ऊर्जा आता हेस्कॉमला देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सृष्टी सोलुशनचे रमेश रामपूरवाडी यांनी सौर ऊर्जेचे संपूर्ण युनिट उभारण्यासाठी परिश्रम घेतले आहेत. त्यामुळे आता मराठा मंडळाचे दंत विद्यालय सौर उर्जेवर चालणार आहे.
सौर उर्जेवर चालणार हे विद्यालय, तसेच अतिरिक्त निर्माण होणारी सौरऊर्जा हेस्कॉमला देण्याचे नियोजन
By Akshata Naik