येथील विजया ऑर्थो आणि ट्रॉमा सेंटरचे डॉ रवि बी.पाटील (एम एस ऑर्थो )आणि सहकारी यांच्यावतीने कंग्राळगल्लीतील छत्रपती शिवाजी महाराज व्यायाम शाळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते.या शिबिरात ज्येष्ठ नागरिक, महिला,युवक यांच्या संपूर्ण शरीराची तपासणी, रक्तदाब, रक्तातील साखर, हाडातील खनिजांची घनता इत्यादी विषयांवर सल्ला देण्यात येऊन औषधे व
गोळ्यांचे वाटप करण्यात आले. डॉ रवि पाटील यांचे सहकारी श्री किरण एस सांबरेकर, डॉ सोमशेखर् डाॅ. शिंदोळकर,डॉ नीलम,डॉ वरुण, डॉ नंदिश रोट्टी श्री. प्रताप यांनी तपासणी कार्यात सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या सुरवातीस श्री किरण एस सांबरेकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक भाषण केले.गल्लीच्या
वतीने उपसरपंच अनंत राव जाधव यांच्याहस्ते डॉ रवि पाटील यांचा सन्मान करण्यात आला. डॉ पाटील यांनी शिबिराचे उद्दिष्ट सांगून चांगले आरोग्य राखण्यासाठी काय करावे याचे मार्गदर्शन केले. श्री मालोजी अष्टेकर यांनी शिबिराबद्दल आभार मानले.
डॉ रवि पाटील हे जनसेवा हीच ईश्वर
सेवा असे मानून कार्य करतात असे ते म्हणाले. सेंटरच्या वतीने पंच मंडळींचा शाल व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. गल्लीतील पंचमंडळाचे शंकर बडवाण्णाचे, अशोक कंग्राळकर गोपाळ सांबरेकर, बाबुराव कुट्रे इ.यावेळी हजर होते. गल्लीतील
अनेकांनी या शिबिराचा लाभ घेतला.