हिंदू तिथीप्रमाणे शिवजयंती 10 मार्च रोजी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान तर्फे साजरी केली जाणार आहे. त्यामुळे पहाटे सहा वाजता छत्रपती शिवाजी उद्यान येथे शिवजन्मोत्सव साजरा केला जाणार आहे.
हिंदू तिथीप्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया शुक्रवार दिनांक 10 मार्च रोजी शिवजयंती असल्याने ती शहरासह प्रत्येक गावात तिथीप्रमाणे साजरी करण्यात यावी असे आवाहन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जिल्हाप्रमुख किरण गावडे यांनी केले आहे.