खणगाव खुर्द ग्रामदेवतेची 17 वर्षांनी श्री महालक्ष्मी देवीची यात्रा भरली होती.यावेळी यात्रे च्या कार्यक्रमाचे मुख्य उद्घाटक म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते आर एम चौगुले उपस्थित होते.
सदर यात्रा बसवांना मंदिर गोकाक रोड खनगाव खुर्द येथे गुरुवार दिनांक 9 मार्च रोजी पार पडली.यावेळी या ठिकाणी समाज प्रबोधनकार युवा कीर्तनकार ह भ प शिवलीलाताई पाटील यांनी उपस्थित भाविकांना आपल्या कीर्तनातून जागृत केले.
यावेळी या यात्रेला करिता अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली यामध्ये मनोहर किणेकर एडवोकेट श्याम पाटील एडवोकेट सुधीर चव्हाण एडवोकेट आर आय पाटील रमाकांत कोंडुसकर शुभम शेळके चेतन पाटील रामचंद्र मोदकेकर अंकुश केसरकर श्रीकांत कदम भरत पाटील मारुती शिंदे राजू बाबू गावडे बाबू कुरबळ मनोज पावशे शिवाजी सुंठकर भागोजी पाटील यासह अनेक मान्यवरांनी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी 17 वर्षांनी पार पडलेल्या श्री महालक्ष्मी यात्रेकरिता उपस्थिती लावली आणि देवीचे दर्शन घेतले.