बेळगाव /प्रतिनिधी
परंपरेप्रमाणे धुलीवंदन पासून पाचव्या दिवशी बेळगाव शहराच्या दक्षिण भागासह तालुक्यात रंगपंचमी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली.
एकमेकांना रंग लावून रंगपंचमीच्या शुभेच्छा देत महिलांनीही रंगोत्सवाचा आनंद लुटला. सकाळपासूनच गावागावांमध्ये रंग उधळण्यास प्रारंभ झाला. शहरात विशेषत: वडगाव, शहापूर, येळळूर भागात तरुणाई आणि बालचमू डॉल्बीच्या तालावर थिरकत होते. अनेक ठिकाणी रंगपंचमीसाठी खास वॉटर शॉवर लावण्यात आले होते.
धुलीवंदना दिवशी काही गावात रंगपंचमी साजरी करण्यात आली. ग्रामीण भागामध्ये होळीच्या पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी करण्याची परंपरा आहे. त्यानुसार रविवारी तालुक्यातील अनेक गावे रंगात रंगून गेली होती.आयुष्यातील दुःख विसरून सप्तरंगाप्रमाणे आपले आयुष्य रंगीत बनवताना दिसत होते.
जल्लोषी वातावरणात एकमेकांना भेटून गल्लीमध्ये कोपऱ्यावर, चौकात, गावाच्या वेशीत रंग उधळण्यात आले.