महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव उत्तरचे अधिकृत उमेदवार वकील अमर यळळुरकर यांनी काळी आमराई येथे प्रचार केला त्यानंतर येथे कोपरासभा घेऊन येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी त्यांनी सर्व नागरिकांना येणारा काळात आपल्या सर्व समस्या निकालात काढू अशी ग्वाही दिली यावेळी घरोघरी अमर येळ्ळूरकर यांचे स्वागत करण्यात आले.
तसेच त्यांनी काळी आमराई भागात आपला झंजावती प्रचार केला यावेळी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद महाराष्ट्र एकीकरण समितीला मिळाला.