2000 – 2001 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता सातवीच्या माजी विद्यार्थ्याकडून सरकारी पूर्ण प्राथमिक शाळेला लोखंडी तिजोरी दिनांक 5 मे 2023 रोजी सुपूर्द करण्यात आली .
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हजगोळी प्राथमिक शाळेचे शिक्षक श्री एस एम ढेकोळकर सर उपस्थित होते .
यांनी तिजोरीचे पूजन केले त्याचबरोबर यळेबैल शाळेचे मुख्याध्यापक श्री ए पी कनगुटकर सर यांनी माजी विद्यार्थ्यांचे आभार मानले .
यावेळी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष श्री राजाराम येळुळकर व श्री भरमू पाटील सदस्य उपस्थित होते त्याचबरोबर माजी विद्यार्थी श्री नाथाजी मरगाळे ,रमेश मरगाळे लक्ष्मण शहापूरकर ,सचिन केसरकर ,गावडू शहापूरकर शोभा शहापूरकर ,सरिता पाटील उपस्थित होते