नावगे क्रॉस व बामनवाडी येथील रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. कित्येक वर्षापासून हा रस्ता खराब झाला होता. वारंवार तक्रार करूनसुद्धा या रस्त्याची साधी डागडुजीही करण्यात येत नव्हती. मात्र गेल्या पंधरा करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. रस्ता पूर्णपणे जेसीबीने खोदून माती आणि खडक भरून टाकण्यात आला आहे. एका बाजूने गटारसाठी चर मारण्यात आली आहे. नावगे क्रॉस येथे विविध औद्योगिक उद्योगधंदे असल्यामुळे नावगे, बामणवाडी, किणये गावातून येणाऱ्या कामगारांची संख्या अधिक आहे.
तसेच या रस्त्यावर गाड्यांचीही मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र कित्येक वर्षापासून हा रस्ता अत्यंत खराब झाला होता.या रस्त्याला कोण वाली आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. सध्या या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.