No menu items!
Friday, August 29, 2025

सर्वात उंच राष्ट्रध्वज सतत फडकवावा, याची महामंडळ व संबंधित अधिकाऱ्यांना सूचना द्या : आसिफ (राजू) सेठ

Must read

आज राष्ट्रध्वज अखंड फडकवण्याच्या कार्यक्रमाचे उद्घाटन बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ (राजू) सेठ
यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी
बेळगाव शहरातील किल्ला कोटेकेरी आवारातील सर्वात उंच राष्ट्रध्वज सतत फडकत राहावा असे सांगितले .यावेळी ते म्हणाले राष्ट्रध्वज हा स्वाभिमान, आदर आणि हृदयातून आला पाहिजे.देशाच्या ध्वजाचा प्रत्येकाने आदर केला पाहिजे, असे ते म्हणाले. केवळ शब्दात देशासाठी काम करू नका. राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना प्रत्येकाने डोके वर करून ध्वजाकडे पाहिले पाहिजे असे सांगितले

त्यानंतर ते म्हणाले राज्याचा, जिल्ह्याचा, शहराचा विकास झाला पाहिजे. प्रलंबित कामांबाबत मी महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी बोललो आहे. 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. काम न करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्यात येणार असून अन्य कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बेळगाव शहरातील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर दोन-तीन दिवसांत अधिकाऱ्यांशी चर्चा करून समस्या सोडविण्याचा प्रयत्न करू, असे त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर दिले.

मुख्यमंत्री करण्याचा निर्णय हायकमांड घेते. तसेच केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी डीसीएम व्हावे, असे मी यापूर्वी एका भाषणात म्हटले होते. पक्षसंघटनेत त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. माझी अजूनही वैयक्तिक इच्छा आहे. आपण डीसीएम व्हावे, या पत्रकारांच्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले.

माजी आमदार फिरोज सेठ म्हणाले की, जी कामे 2018 मध्ये पूर्ण व्हायला हवी होती ती काही लोकांनी राजकारणामुळे बंद पाडली आहेत. खऱ्या अर्थाने स्मार्ट सिटीचे काम सुरू झाले पाहिजे. स्मार्ट सिटी प्रकल्पाचे जे काम सुरुवातीला होते ते पुन्हा सुरू करावे. मी आमदार राजू सेठ यांना सांगितले आहे की, ही पूर्वीची योजना तपासा. सर्व अधिकाऱ्यांनी उत्तम कारभार केला असून आमचे सहकार्य सदैव राहील, असेही ते म्हणाले.
बेळगावी स्मार्ट सिटी लोकांच्या निधीतून उभारली जात आहे. यामध्ये कोणीही भ्रष्टाचार खपवून घेणार नाही. अशोकनगरमध्ये बांधण्यात आलेले स्टेडियम आजतागायत पूर्ण झालेले नाही. तसेच काही ठिकाणी विद्युत खांबही व्यवस्थित बसवलेले नाहीत. गरज असेल तेथे विजेचे खांब लावावेत, अशी विनंती आमदारांना केली असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी महामंडळाचे सदस्य समिउल्ला माडीवाले, गजू धरणनायक आदी उपस्थित होते.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!